Isaiah 37:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर परमेश्वर हिज्कीयाला म्हणाला, “हिज्कीया, माझे हे बोलणे खरे आहे हे दाखविण्यासाठी मी तुला खूण देईन. ह्या वर्षी धान्य पेरले जाणार नाही. म्हणून या वर्षी तुम्हाला मागच्या वर्षांच्या पिकातील जुनं धान्य खावे लागेल. पण तीन वर्षांत तुम्ही पेरलेले धान्य खाल. तुम्ही पिकाची कापणी कराल आणि तुमच्याजवळ खाणे मुबलक असेल तुम्ही द्राक्षांची लागवड कराल आणि द्राक्षे खाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता तुला हे चिन्ह देतो: यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल, पुढल्या वर्षी त्याला खोडवा फुटेल तो खाल; तिसर्या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हिज्कीयाह, तुझ्यासाठी चिन्ह असेल: “या वर्षी तुम्ही आपोआप उगविलेले धान्य खाल, तरी पुढील वर्षी त्यातूनच उगविलेले खाल. परंतु तिसऱ्या वर्षी पेरणी व कापणी कराल, द्राक्षमळे लावाल व त्याची फळे खाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्यासाठी हे चिन्ह होईलः या वर्षी तुम्ही जे काही आपोआप उगवेल ते खाल आणि दुसऱ्या वर्षी जे त्यातून उगवेल ते खाल, परंतु तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरणी करा व कापा, द्राक्षमळे लावा आणि त्याचे फळ खा.