Isaiah 37:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून अश्शूरच्या राजाला परमेश्वराचा संदेश असा आहे. “तो ह्या शहरात प्रवेश करणार नाही, तो ह्या शहराच्या दिशेने एकसुध्दा बाण मारणार नाही. तो ढाली घेऊन ह्या शहराशी लढण्यास पुढे सरसावणार नाही. तो वेशीच्या भिंतीला उतरंड बांधणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो, तो ह्या नगरापर्यंत येणार नाही; ह्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन ह्याच्याशी सामना करणार नाही आणि ह्यावर मोर्चा रचणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून अश्शूरच्या राजाविषयी याहवेह असे म्हणतात: “तो या शहरात प्रवेश करणार नाही किंवा एखादा बाणही सोडणार नाही. तो या ठिकाणी ढाल घेऊन येणार नाही किंवा तटबंदीबाहेर मोर्चे बांधणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून अश्शूरच्या राजाविषयी परमेश्वर हे म्हणतोः तो या नगरात येणार नाही, किंवा येथे एकही बाण मारणार नाही, तो या समोर ढालीसह येणार नाही किंवा याविरूद्ध वेढा रचून थैमान घालणार नाही.