Isaiah 38:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझे घर, माझा मेंढपाळाचा तंबू जमीनदोस्त केला जात आहे आणि माझ्यापासून हिसकावून घेतला गेला. जसे मागावरचे कापड कापून त्याची गुंडाळी केली जाते, तसा मी संपलो आहे. तू माझे आयुष्य अल्प काळातच संपविलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे घर मोडले आहे, ते धनगराच्या राहुटीसारखे उखडून नेण्यात आले आहे; कोष्ट्याप्रमाणे मी आपले जीवित आटोपले आहे; तो मागाच्या ताण्यांतून मला तोडणार आहे; दिवस जाऊन रात्र येईल तेव्हा तू माझा अंत करशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझे घर पाडले गेले आणि माझ्याकडून काढून घेतले गेले. विणकराप्रमाणे मी माझे जीवन गुंडाळून टाकले आहे, आणि त्यांनी मला विणकऱ्याच्या मागापासून तोडून टाकले आहे; रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे जीवन काढून घेतले आहे, आणि मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझ्यापासून दूर केलेली आहे; मी विणकऱ्याप्रमाणे आपले जीवन गुंडाळले आहे; तो मला मागावरून कापून काढणार आहे; दिवसाच्या व रात्रीच्यामध्ये तू माझा शेवट करशील.