Isaiah 38:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी कबुतराप्रमाणे घुमलो, पक्ष्याप्रमाणे कलकललो, माझे डोळे थकले, तरीही मी स्वर्गाकडे बघत राहिलो. माझ्या प्रभू, मी खूप निराश झालो आहे. मला मदत करशील असे वचन दे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निळवीप्रमाणे, सारसाप्रमाणे मी चिवचिवलो; पारव्याप्रमाणे मी घुमलो; वर पाहून पाहून माझे डोळे शिणले. हे परमेश्वरा, माझ्यावर गहजब झाला आहे, मला जामीन हो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी निळवी किंवा सारसाप्रमाणे चित्कारलो मी शोक करणाऱ्या कबुतरासारखा कण्हत राहिलो. आकाशाकडे पाहून माझे डोळे दुर्बल झाले. मला धमकाविण्यात आले आहे; हे प्रभू, मला मदत करण्यासाठी या!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी निळवीप्रमाणे किलबिललो; पारव्याप्रमाणे मी कुंजन केले; माझे डोळे वर पाहून पाहून थकले आहेत. माझ्या प्रभू, माझ्यावर जुलूम झाला आहे. मला मदत कर.”