Isaiah 39:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग यशयाने विचारले, “तुझ्या राज्यात त्यांनी काय काय पाहिले?” हिज्कीया उत्तरला, “माझ्या राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. माझी सर्व संपत्ती मी त्यांना दाखविली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने विचारले, “त्यांनी आपल्या घरात काय-काय पाहिले?” हिज्कीयाने म्हटले, “माझ्या घरातले सर्वकाही त्यांनी पाहिले; त्यांना माझ्या भांडागारातले दाखवले नाही असे काहीच नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संदेष्ट्याने विचारले, “त्यांनी तुझ्या राजवाड्यात काय पाहिले?” हिज्कीयाह म्हणाला, “त्यांनी माझ्या राजवाड्यातील सर्वकाही पाहिले. माझ्या खजिन्यांमध्ये असे काहीही राहिले नाही, जे मी त्यांना दाखविले नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यशयाने विचारले, “तुझ्या घरात त्यांनी काय काय पाहिले?” हिज्कीयाने उत्तर दिले, “माझ्या घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. मी त्यांना माझ्या सर्व मोलवान वस्तू दाखविल्या नाहीत असे काहीच नाही.”