Isaiah 4:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यावेळी सीयोन व यरूशलेम येथे जे लोक राहत असतील त्यांना पवित्र मानले जाईल. देवाची कृपा झाल्याने त्यांची नावे खास यादीत समाविष्ट केली गेली आहेत. त्या सर्व लोकांच्या बाबतीत हे घडेल. त्या सर्व यादीतील लोकांना जिवंत राहण्याची संमत्ती दिली जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग असे होईल की सीयोनेत उरलेल्या, यरुशलेमेत शेष राहिलेल्या ज्या प्रत्येकाचे नाव यरुशलेमेतील जीवन पावणार्‍यांच्या यादीत लिहिले आहे त्या प्रत्येकाला पवित्र म्हणतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सीयोनात उरलेले लोक जे यरुशलेममध्येच राहिले, त्यांची नावे नोंदवली गेली आहेत, ते पवित्र म्हणविले जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर जो कोणी सियोनात राहील, जो कोणी यरूशलेमेत बाकी राहील, प्रत्येक जण जो कोणी येरुशलेमेत जिवंत असा गणला जाईल त्यास पवित्र असे म्हणतील,