Isaiah 40:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले? आकाशाचे मोजमाप करण्यासाठी कोणी आपला हात वापरला? पृथ्वीवरची धूळ वाडग्याने कोणी मापली? डोंगर आणि टेकड्या तराजूने कोणी तोलल्या? हे सर्व करणारा परमेश्वर होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जलांचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे? आकाशाचे माप आपल्या वितीने कोणी घेतले आहे? पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे? डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलल्या आहेत?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे, किंवा त्यांच्या हाताच्या रुंदीने आकाशात चिन्हे मापली आहेत? पृथ्वीवरील धूळ टोपलीत कोणी ठेवली आहे, किंवा पर्वतांचे वजन तराजूवर कोणी केले आहे आणि कोणी टेकड्या तोलल्या आहेत?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले आहे, आकाशाचे माप आपल्या वतीने, पृथ्वीवरची धूळ पाटीत धरली, डोंगराचे वजन तागडीत किंवा टेकड्या तराजूत तोलल्या आहेत?