Isaiah 40:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे बघा! राष्ट्र हा परमेश्वराच्या सृष्टीचा फार सूक्ष्म अंश आहे. राष्ट्र हे बादलीतल्या पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे आहे. जर परमेश्वराने सर्व राष्ट्रे गोळा करून त्याच्या तराजूच्या पारडयात टाकली तर ती धुळीच्या लहान लहान कणांप्रमाणे दिसतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहर्‍यांतल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत; पाहा, द्वीपेही तो धुळीच्या कणांसारखी उचलतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत; त्यांना तराजूवर असलेली धूळ समजले जाते; बेटांना ते असे तोलतात, जणू ते धूलिकण आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, राष्ट्रे बादलीतल्या एका थेंबासमान आहेत आणि तराजूतल्या धुळीच्या कणासारखी मोजली आहे; पाहा तो बेटही धुळीच्या कणासारखे उचलतो.