Isaiah 40:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते राजे (अधिपती) रोपट्यांप्रमाणे आहेत. जमिनीत लावल्यावर ती रूजायच्या आधीच देवाच्या जोरदार वाऱ्याने ती “रोपटी” सुकतात आणि मरतात व वारा त्यांना गवताच्या काडीप्रमाणे दूर उडवून देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो म्हणजे ते सुकून जातात, वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लागण करताच, पेरणी करताच, ते जमिनीत मूळ धरू लागते तोच, ते त्यांच्यावर फुंकर घालतात आणि ते कोमेजून जाते, आणि भुशाप्रमाणे वारा ते वाहून नेतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, ते केवळ लावले आहेत; पाहा, ते केवळ पेरले आहेत; पाहा त्यांनी केवळ भूमीत मूळ धरले आहे, तो त्यांच्यापुढे त्यावर फुंकर घालतो आणि ते सुकून जातात व वादळ त्यांना धसकटासारखे उडवून नेते.