Isaiah 40:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर देव फार सुज्ञ आहे, हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे व तुम्हाला ते माहीतही आहे. देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही. परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही. जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली. परमेश्वर चिरंजीव आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धी अगम्य आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? याहवेहच सनातन परमेश्वर आहेत, पृथ्वीच्या दिगंताचे उत्पन्नकर्ता तेच आहेत. ते कधी थकणार वा कंटाळणार नाहीत, त्यांची आकलन शक्ती अगम्य आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला माहीत नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, पृथ्वीच्या सीमा निर्माण करणारा, थकत किंवा दमत नाही; त्याच्या बुद्धीला मर्यादा नाही.