Isaiah 41:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी उत्तरेकडील एका माणसाला उठविले तो उगवत्या सूर्याच्या दिशेकडून म्हणजे पूर्वेकडून येत आहे. तो माझी उपासना करतो. कुंभार ज्याप्रमाणे चिखल तुडवितो, त्याप्रमाणे तो विशिष्ट माणूस राजांना तुडवेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी उत्तरेकडून एकाची उठावणी केली आहे; तो आला आहे. जो माझे नाम घेतो त्याची मी सूर्याच्या उगवतीकडून उठावणी केली आहे; चिखल तुडवतात किंवा कुंभार मातीचा गारा तुडवतो तसा तो अधिपतीस तुडवील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी उत्तरेकडून एकाला चिथविले आहे आणि तो येत आहे— एक जो सूर्योदयाकडून येतो आणि माझ्या नावाचा धावा करतो. तो राज्यकर्त्यांना तुडवेल, जणू ते बांधकामाचा चुना आहेत, जणू तो माती तुडविणारा कुंभार आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी उत्तरेपासून एकाला उठविले आहे आणि तो आला आहे; तो सूर्याच्या उगवतीपासून जो माझ्या नावाने हाक मारतो त्यास मी बोलावून घेतो, आणि तो चिखलाप्रमाणे सत्ताधाऱ्यास तुडविल, जसा कुंभार चिखल पायाखाली तुडवतो तसा त्यांना तुडविल.”