Isaiah 41:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एकजण मूर्ती करण्यासाठी लाकूड कापतो. तो सोन्याचे काम करणाऱ्याला उत्तेजन देतो. दुसरा हातोडीने धातू मऊ करतो. तो ऐरणी वर घाव घालणाऱ्याला उत्तर देतो हा शेवटचा कामगार म्हणतो, ‘हे काम चांगले झाले. सोने आता निघून येणार नाही.’ नंतर तो खिळ्याने मूर्ती पायावर पक्की बसवितो. मग मूर्ती खाली पडू शकत नाही आणि ती कधीही सरकत नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ओतार्‍याने सोनाराला, हातोड्याने गुळगुळीत करणार्‍याने ऐरणीवर घण मारणार्‍याला, धीर दिला आणि “सांधा चांगला बसला आहे” असे म्हटले व मूर्ती ढळू नये म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धातू कारागीर सोनाराला प्रोत्साहित करतो, आणि हातोडीने धातू गुळगुळीत करणारा, ऐरणीवर घण मारणार्‍यास उत्तेजन देतो. धातू जोडणीबद्दल तो म्हणतो, “हे चांगले आहे.” मग दुसरा, ती मूर्ती कलंडू नये म्हणून त्यास खिळे ठोकतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो, आणि तो जो हातोड्याने काम करतो जो ऐरणीसह काम करतो, त्यास धीर देऊन सांधण्याविषयी, ते चांगले आहे. असे म्हणतो मग ते सरकू नये म्हणून तो ते खिळ्यांनी घट्ट बसवतो.”