Isaiah 42:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वाळवंटांनो, नगरांनो, केदार मधील शेतांनो, परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा. सेलातील लोकांनो, आनंदाने गा. तुमच्या उंच डोंगरकड्यावरून गा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरण्य व त्यातील नगरे आणि ज्या खेड्यापाड्यांत केदार वसत आहे ती, गाण्याचा गजर करोत; सेलाचे रहिवासी उत्सव करोत, ते टेकड्यांच्या माथ्यांवर मोठ्याने जयघोष करोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरण्यात व त्याभोवती असणाऱ्या नगरांचे आवाज उंचावू दे; जिथे केदारचा रहिवास आहे, त्या वस्त्या आनंद करोत. सेलाच्या लोकांनो हर्षगीते गा; त्यांना पर्वतशिखरावरून गर्जना करू दे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाळवंटांनो आणि नगरांनो आरोळी मारा, ज्या खेड्यात केदार राहतो, मोठ्याने आनंदाने ओरडा! सेलात राहणाऱ्यांनो गायन करोत, डोंगरमाथ्यावरून आरोळी करोत.