Isaiah 42:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“बराच वेळ मी काही बोललो नाही. मी संयम ठेवला आणि गप्प राहिलो. पण आता प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मी मोठ्याने ओरडेन. मी खूप जोराने व मोठ्याने श्वासोच्छवास करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी दीर्घकाळ मौन धरले; मी स्तब्ध राहिलो; मी स्वतःला आवरले; वेणा देणार्या स्त्रीप्रमाणे मी आता कण्हत आहे, उसासे व धापा टाकत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“दीर्घकालापासून मी स्तब्ध राहिलो आहे, मी शांत राहून स्वतःला आवर घातला आहे. परंतु आता, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे, मी आक्रोश करेन, धापा टाकेन व माझी दमछाक होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बराच वेळ मी काही बोललो नाही; मी स्तब्ध राहिलो आणि स्वतःवर संयम ठेवला; आता मी प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मोठ्याने ओरडेन, मी उसासे व धापा टाकीन.