Isaiah 42:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आंधळ्यांना कधीही माहीत नसलेल्या मार्गाने मी घेऊन जाईन. पूर्वी कधीही ते गेले नव्हते अशा स्थळी मी त्यांना नेईन. मी त्यांच्यासाठी अंधार प्रकाशात बदलीन. खडबडीत जमीन गुळगुळीत करीन. मी कबूल केलेल्या गोष्टी करीन. मी माझ्या लोकांचा त्याग करणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी आंधळ्यांना त्यांना माहीत नसलेल्या मार्गावरून चालवेन, अपरिचित रस्त्यावरून मी त्यांचे मार्गदर्शन करेन; मी त्यांच्यापुढील अंधकार प्रकाशात बदलेन आणि खडबडीत जागा सपाट करेन. या गोष्टी मी करेन; मी त्यांना टाकणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आंधळ्यांना माहीत नसलेल्या मार्गाने आणीन, त्यांना माहीत नसलेल्या वाटेने मी त्यांना नेईन, मी त्यांच्यापुढे अंधाराचा प्रकाश करीन, वाकडी ठिकाणे सरळ करीन. या गोष्टी मी करीन आणि मी त्यांना सोडणार नाही.