Isaiah 42:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण काही लोकांनी मला अनुसरायचे थांबविले आहे, त्यांच्याजवळ सोन्याने मढविलेल्या मूर्ती आहेत. ते त्यांना म्हणतात, ‘तुम्हीच आमचे देव आहात.’ ते त्या खोट्या देवांवर विश्वास ठेवतात, पण त्या लोकांची निराशा होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे कोरीव मूर्तींवर भाव ठेवतात, ओतीव मूर्तींना “तुम्ही आमचे देव आहात” असे म्हणतात, ते उलथून पडतील व अगदी लज्जित होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जे मूर्तींवर विश्वास ठेवतात, जे मूर्तींना म्हणतात कि, ‘तुम्ही आमची दैवते आहात,’ ते पूर्णपणे लज्जित होऊन मागे फिरतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे कोणी कोरीव मूर्तीवर भरवसा ठेवतात, ओतीव मूर्तींना म्हणतात, तुम्ही आमचे देव आहात. ते मागे वळतील, ते पूर्णपणे लज्जित होतील.