Isaiah 42:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण लोकांकडे पाहा. दुसऱ्यांनी त्यांना पराभूत करून लटूले आहे. सर्व तरूण घाबरले आहेत. ते तुरूंगात बंद केले गेले आहेत. दुसऱ्या लोकांनी त्यांच्याकडून पैसा काढून घेतला आहे. त्यांना वाचविणारा कोणीही नाही. दुसऱ्यांनी त्यांचा पैसा घेतला आणि “तो परत दे” असे म्हणायला तेथे कोणीही नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी हे लुटलेले, नागवलेले लोक आहेत; ते सर्व गर्तांच्या पाशात सापडले आहेत, कारागृहात कोंडले आहेत; ते भक्ष्य झाले आहेत, त्यांना सोडवणारा कोणी नाही; ते लूट झाले आहेत, आणि “ती परत द्या” असे म्हणणारा कोणी नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण हेच लोक लुटले व लुबाडले गेले आहेत, ते सर्वजण खड्ड्यात अडकले आहेत किंवा तुरुंगात लपवून ठेवण्यात आले आहेत. तेच लूट बनले आहेत, त्यांना सोडविणारा कोणी नाही; त्यांना लूट बनविण्यात आले आहे, “त्यांना परत पाठवा,” असे म्हणणारे कोणीही नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण हे लोक लुटलेले आणि लुबाडलेले आहेत; ते सर्व खड्ड्यामध्ये सापळ्यात पडलेले आहेत, तुरुंगात कैदी झाले आहेत; ते सर्व लूट असे झाले आहेत त्यांना सोडवणारा कोणी नाही आणि त्यांना परत माघारी म्हणणारा कोणी नाही!