Isaiah 42:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याकोबची व इस्राएलची संपत्ती लुटायला कोणी लावली? परमेश्वरानेच त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. आपण परमेश्वराच्या विरूध्द वागून पाप केले आहे. म्हणून परमेश्वराने लोकांना आपली संपत्ती लुटू दिली. इस्राएलमधील लोकांना परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगायचे नव्हते. त्यांनी परमेश्वराची शिकवण ऐकली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोबाला लुटीस कोणी जाऊ दिले? इस्राएलास लुटारूंच्या स्वाधीन कोणी केले? ज्या परमेश्वराविरुद्ध आम्ही पाप केले त्यानेच की नाही? त्याच्या मार्गांनी ते चालेनात, त्याचे नियमशास्त्र ते ऐकेनात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकोबाची लूट होण्यासाठी त्यांना कोणी हवाली केले, आणि इस्राएलला लुबाडू दिले? ज्यांच्याविरुद्ध आम्ही पातक केले ते याहवेहच नाहीत काय? त्यांनी याहवेहचे मार्ग अनुसरले नाहीत; त्यांच्या नियमांचे पालन केले नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबाला लुटीस व इस्राएलास लुटणाऱ्यांस कोणी दिले? ज्या परमेश्वराविरूद्ध आम्ही पाप केले, त्याच्या मार्गाने चालण्यास त्यांनी नकार दिला आणि त्याचे नियम पाळण्याचे त्यांनी नाकारले त्यानेच की नाही?