Isaiah 42:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून परमेश्वर त्यांच्यावर रागावला. देवाने त्यांच्याविरूध्द मोठी युध्दे घडवून आणली. इस्राएलच्या लोकांभोवती जणू आग भडकावी तसे हे होते. पण काय घडत आहे त्यांना कळले नाही. ते जणू जळत होते पण काय होत होते ते समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून त्याने त्यांच्यावर आपला कोप, आपला संताप व युद्धाचा गहजब ह्यांचा वर्षाव केला; त्याला चोहोकडून आग लागली तरी त्याला कळले नाही; तिचा भडका झाला तरी त्याने त्याची पर्वा केली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणूनच याहवेहने आपला क्रोधाग्नी आणि लढाईचा विध्वंस त्यांच्यावर ओतला. चारही बाजूने ते ज्वालांनी वेढले गेले होते, तरीसुद्धा त्यांना उमगले नाही; ज्वालांनी ते भस्म झाले, पण त्यांनी ते मनावर घेतले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून त्याने आपला भडकलेला कोप त्यांच्याविरुद्ध नासधूसीच्या युद्धासह ओतला. त्याने त्यांच्या सभोवती आग लावली तरी त्यांना कळले नाही; त्यास जाळले. पण तरी तो मनावर घेईना.