Isaiah 43:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जे लोक रथ, घोडे व सैन्ये यांच्यानिशी माझ्याशी लढतात त्यांचा परा़भव होईल. ते पुन्हा उठणार नाहीत त्यांचा नाश होईल. पण त्यातील ज्योत मावळावी तसे ते नाहीसे होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर ह्यांना बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत, त्यांच्याने उठवत नाही, ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत, असा जो परमेश्वर तो म्हणतो की:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांनी इजिप्तच्या सैन्याला व त्याच्या रथांसह व घोड्यांसह व त्यांच्या मजबूतीच्या ज्यादा कुमकीसह बुडविले, तेव्हा तेवत्या वाती मालवाव्या तशा, त्यांच्या प्राणज्योती अशा मालविल्या, कि ते परत कधीही न उठण्यासाठी तिथेच गारद झाले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो रथ व घोडा, सैन्य व वीर यांना बाहेर काढून आणतो. ते एकत्रित खाली पडतात; ते पुन्हा कधीच उठत नाहीत; ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत.