Isaiah 43:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
का? कारण मी आता नव्या गोष्टी घडवून आणीन. आता तुम्ही कोवळ्या रोपटयाप्रमाणे वाढाल. हे सत्य आहे, ने नक्कीच तुम्हाला माहीत आहे. मी खरोखरच वाळवंटातून रस्ता तयार करीन. कोरड्या भूमीवर नद्या निर्माण करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे! ती आता उभारत आहे; तुम्हाला ते आकलन होत नाही का? मी अरण्यातून रस्ता तयार करत आहे ओसाड भूमीत झरे बनवित आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे; आता ती घडण्याची सुरवात होत आहे; तुम्ही ती पाहणार नाही का? मी रानातून रस्ता तयार करीन आणि वाळवंटातून पाण्याचे प्रवाह वाहवीन.