Isaiah 43:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मला तृप्त करण्यासाठी लागणाऱ्या अर्पणांसाठी आणि धुपासाठी तू स्वत:चा पैसा वापरला नाहीस. उलट तुझ्या पापांचे ओझे माझ्यावर लादलेस तुझ्या दुष्कृत्यांचा मला वीट येईपर्यंत तू पाप केलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू पैसे देऊन माझ्यासाठी अगरू विकत घेतला नाहीस, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस; तर तू आपल्या पातकांची माझ्यावर सक्ती केलीस, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिणवलेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही माझ्यासाठी कधी सुगंधी दालचिनी विकत आणली नाही, किंवा भरगच्च चरबीचे यज्ञार्पण केले नाही. उलट, केवळ तुमच्या पातकांचे ओझे मला दिले व तुमच्या अपराधांनी मला शिणविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू माझ्यासाठी गोड सुगंधीत ऊस पैका देऊन आणला नाही, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस. पण तू आपल्या पापांचा भार माझ्यावर घातला आहे. तू आपल्या वाईट कृत्यांनी मला श्रमविले आहे.