Isaiah 44:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण थोडे लाकूड शिल्लक आहे. मग त्यापासून मूर्ती करून तो त्या मूर्तीलाच देव म्हणतो. तो तिच्यापुढे वाकतो आणि तिची पूजा करतो. तो प्रार्थना करतो, “तू माझा देव आहेस. माझे रक्षण कर.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडतो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवतो; तो तिच्या पाया पडतो, तिचे भजनपूजन करतो; तिची प्रार्थना करतो; तो तिला म्हणतो, “माझे तारण कर, तू माझा देव आहेस.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि उरलेल्या लाकडापासून तो आपले दैवत म्हणजे मूर्ती तयार करतो; त्या मूर्तीस नमन करून तिची पूजा करतो, तो त्याची प्रार्थना करतो आणि म्हणतो “माझी सुटका कर! तू माझ्या देव आहेस!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिल्लक राहिलेल्या लाकडाचे तो देव बनवतो, आपली कोरीव प्रतिमा घडवतो; तो त्याच्यापुढे नतमस्तक होतो व पूजा करतो, आणि प्रार्थना करून म्हणतो, तू माझा देव आहेस म्हणून मला वाचव.