Isaiah 44:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी ह्या गोष्टींचा कधीच विचार केला नाही. त्यांना काही समजत नसल्याने त्यांनी असा विचार केला नाही “अर्धे लाकूड मी जाळले. त्या विस्तवावर मी भाकरी भाजली, मांस शिजविले. मग मी जेवलो आणि उरलेल्या लाकडातून मी ही भयानक वस्तू तयार केली. मी लाकडाच्या ओंडक्याचीच पूजा करीत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी हे ध्यानात आणत नाही; “त्याचा अर्धा भाग आपण अग्नीत जाळला, त्याच्या निखार्यांवर भाकर भाजली, मांस भाजून खाल्ले आणि त्याच्या अवशेषाची अमंगल वस्तू मी कशी बनवू? झाडापासून काढलेल्या लाकडाच्या पाया मी कसा पडू?” असे म्हणण्याइतके कोणाला ज्ञान नाही, अक्कल नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणीही थांबून विचार करीत नाही, कोणालाही समज नाही व ते जाणून असे म्हणत नाहीत, “अरे! हा तर लाकडाचा ठोकळा आहे; यातील काही भाग मी सरपण म्हणून वापरला, याच्या कोळशावर मी भाकरही भाजली व मांस शिजवून ते खाल्ले. मग यातील अवशिष्ट भागाची मी तिरस्करणीय वस्तू बनवावी काय? मी लाकडाच्या ठोकळ्याला नमन करावे काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणी विचार करीत नाही किंवा त्यांना नीट समजत नाही ते म्हणतात, मी लाकडाचा एक भाग अग्नीत जाळला; होय, मी त्याच्या निखाऱ्यावर भाकर भाजली. मी त्याच्या निखाऱ्यावर मांस भाजले व खाल्ले. आता त्याच्या दुसऱ्या भागाच्या लाकडाचा आराधनेसाठी काहीतरी ओंगळ बनवू काय? मी लाकडाच्या ठोकळ्याच्या पाया पडू काय?