Isaiah 44:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या माणसाला, तो काय करीत आहे, ते कळत नाही. तो गोंधळलेला आहे. त्यामुळे त्याचे मन त्याला चुकीच्या मार्गाने नेते. तो स्वत:ला वाचवू शकत नाही. तो चूक करतोय हे त्याला दिसत नाही. “मी हातात धरलेली मूर्ती म्हणजे खोटा देव आहे” असे तो म्हणणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो राख भक्षण करतो, त्याचे हृदय मूढ झाल्यामुळे तो बहकला आहे; तो आपला जीव वाचवू शकत नाही; “माझ्या उजव्या हातात आहे ती साक्षात लबाडी नव्हे काय?” असे तो म्हणत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असा मनुष्य राख भक्षण करतो; संभ्रमात पडलेले अंतःकरण त्याला चुकीचे मार्गदर्शन करते; तो स्वतःला वाचवू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही “ही माझ्या उजव्या हातातील वस्तू निव्वळ खोटेपणा नाही का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे जसे तो जर राख खातो; त्याचे फसवलेले हृदय चुकीच्या मार्गाने नेते. तो आपल्या जीवाला वाचवू शकत नाही किंवा तो म्हणत नाही, “माझ्या हातात धरलेल्या या गोष्टी खोटे देव आहेत.” असे तो म्हणणार नाही.