Isaiah 44:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
खोटे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. पण परमेश्वर त्यांचा खोटेपणा उघड करतो. जादूटोणा करणाऱ्यांना परमेश्वर मूर्ख बनवितो. शहाण्यांनासुध्दा परमेश्वर गोंधळात टाकतो. त्यांना वाटते आपल्याला फार समजते पण देव त्यांना हास्यास्पद बनवितो. 26लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे जे व्यर्थ करतात आणि दैवप्रश्न करणाऱ्यांना मूर्ख ठरवितात, जो सुज्ञ माणसांचे ज्ञान उलथून टाकतो आणि ते निरर्थक बनवितो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
व्यर्थ बोलणाऱ्याचे शकून मी निष्फळ करतो आणि जे शकून वाचतात त्यांना काळिमा लावतो; जो मी ज्ञानाचे ज्ञान मागे फिरवतो आणि त्यांचे सल्ले मूर्खपण करतो.