Isaiah 44:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
घाबरू नका. काळजी करू नका. मी काय घडणार हे नेहमीच तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. दुसरा कोणीही देव नाही. मीच एकमेव देव आहे. दुसरा कोणीही ‘खडक’ नाही. मला माहीत आहे की मी एकमेव आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
भयभीत होऊ नका, थरथर कापू नका; मी मागेच तुला हे ऐकवले आहे व कळवले की नाही? तुम्ही माझे साक्षी आहात, माझ्यावेगळा कोणी देव आहे काय? माझ्यावेगळा कोणी दुर्ग नाही; मला कोणी ठाऊक नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भिऊ नका, थरथर कापू नका. मी अशी घोषणा केली नव्हती का व हे फार पूर्वी जाहीर केले नव्हते का? तुम्ही माझे साक्षीदार आहात. माझ्याशिवाय कोणी दुसरा परमेश्वर आहे काय? नाही, माझ्याशिवाय दुसरा खडक नाही; माझ्या माहितीत कोणी नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही भिऊ नका किंवा घाबरे होऊ नका. पुरातन काळापासून मी तुला सांगितले आणि जाहीर केले नाही काय? तू माझा साक्षीदार आहे. माझ्याशिवाय तेथे कोणी देव आहे काय? तेथे कोणी दुसरा ‘खडक’ नाही; मला कोणी माहीत नाही.”