Isaiah 45:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोरेशला चांगल्या गोष्टी करण्यासाठी मीच शक्ती दिली. मी त्याचे काम सोपे करीन. कोरेश माझी नगरी पुन्हा वसवेल. तो माझ्या लोकांना मुक्त करील. तो माझ्या लोकांना मला विकणार नाही. ह्या गोष्टी करण्यासाठी मला त्याला काही द्यावे लागणार नाही. लोक मुक्त केले जातील. आणि त्यासाठी मला काही मोजावे लागणार नाही.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मीच न्याय्य दृष्टीने कोरेशाची उठावणी केली; मी त्याचे सगळे मार्ग सरळ करीन; तो माझे नगर बांधील व काहीएक मोल अथवा मोबदला न घेता बंदिवान झालेल्या माझ्या लोकांना मुक्त करील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझा न्याय्य हेतू सिद्धीस नेण्यास मीच सायरसला उभारेन: त्याचे सर्व मार्ग मी सरळ करेन. तो माझे शहर पुनर्निर्मित करेल, माझे बंदिवान लोक मोकळे करेल, पण ते तो बक्षीस किंवा मोबदल्यासाठी करणार नाही, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील. तो माझे नगर बांधील; आणि काही मोल किंवा मोबदला न घेता माझ्या बंदिवान झालेल्या लोकांस घरी जाण्यास सोडून देईल. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.