Isaiah 45:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी गुप्तपणे कधी बोललो नाही. मी मोकळेपणानेच बोललो. मी जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात माझे शब्द लपविले नाहीत. रिकाम्या जागी मला शोधा’ असे मी याकोबच्या लोकांना कधीही सांगितले नाही. मी परमेश्वर आहे. मी नेहमीच सत्य बोलतो. खऱ्या गोष्टीच मी सांगतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशाच्या स्थळी बोललो असे नाही; ‘शून्य स्थळी मला शोधा,’ असे याकोबाच्या वंशाला मी म्हणालो नाही; नीतिमत्ता सांगणारा, रास्त गोष्टी विदित करणारा असा मी परमेश्वर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी गुप्तपणे, एखाद्या अंधार्या ठिकाणाहून बोललो नाही; मी याकोबाच्या वंशजांना असे म्हटले नाही, ‘माझा व्यर्थच शोध घ्या.’ मी, याहवेह, जे सत्य तेच बोलतो; जे योग्य आहे तेच घोषित करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी एकटेपणात, गुप्त जागी कधी बोललो नाही; तुम्ही व्यर्थ जागी मला शोधा असे मी याकोबाच्या वंशाना कधीही सांगितले नाही. मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणे बोलतो; रास्तगोष्टी घोषणा करणारा आहे.