Isaiah 45:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोक म्हणतील ‘चांगलुपणा आणि सामर्थ्य फक्त परमेश्वराकडूनच मिळते.”‘ काही लोक देवावर रागावतात पण परमेश्वराचे साक्षीदार येतील आणि परमेश्वराने केलेल्या गोष्टींबद्दल सांगतील, मग परमेश्वरावर रागावणारे लोक लाजेने माना खाली घालतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्याविषयी म्हणतील की केवळ परमेश्वराच्या ठायीच न्याय्यत्व व सामर्थ्य आहे; त्याला प्रत्येक जण शरण येईल; त्याच्यावर संतापलेले सर्व लज्जित होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते माझ्याबद्दल म्हणतील, ‘केवळ याहवेहमध्येच आमची सुटका व सामर्थ्य आहे.’ ” जेव्हा त्यांच्यावर संतापलेले सर्वजण त्यांच्याकडे येतील, तेव्हा ते लज्जित होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण व सामर्थ्य आहे. जे सर्व त्याच्यावर रागावले आहेत ते त्याच्यापुढे भीतीने दबकत लज्जित होऊन येतील.