Isaiah 45:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“माझा सेवक याकोब, आणि माझे निवडलेले लोक, म्हणजे इस्राएल ह्यांच्यासाठी मी हे करतो. कोरेश, मी तुला नावाने हाक मारीत आहे. तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला नावाने ओळखतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझा सेवक याकोबासाठी, माझ्या निवडलेल्या इस्राएलसाठी, तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला नावाने हाक मारून बोलाविले आणि तुला मानाच्या उपाधीने अलंकृत केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी, मी तुला नावाने हाक मारली आहे. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले.