Isaiah 45:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मी एकटाच देव आहे. हे मी ह्या सर्व गोष्टी करतो, त्यावरून लोकांना कळेल. मीच परमेश्वर आहे, दुसरा कोणीही देव नाही’ हे पूर्वेपासून पश्चिमेपर्यत सर्व लोकांना कळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्यावेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सर्व लोकांना कळेल की माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाहीच. मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही. मी परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही.