Isaiah 45:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ह्या लोकांकडे पाहा ते त्यांच्या निर्मात्याशीच वाद घालीत आहेत. माझ्याशी वाद घालणाऱ्यांकडे पाहा. ते खापराच्या तुकड्यासारखे आहेत. कुंभार भांडे करण्यासाठी मऊ, ओला चिखल वापरतो पण चिखल त्याला ‘तू काय करतोस?’ असे विचारीत नाही. निर्मितीला निर्मात्याला प्रश्र्न विचारण्याची हिंमत नसते. हे लोक त्या चिखलासारखे आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो त्याला धिक्कार असो! तो मातीच्या खापर्यांपैकी एक आहे. ‘तू काय करतोस’ असे माती आपल्या घडणार्याला म्हणेल काय? ‘तुला हात नाहीत’ असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो, त्याला धिक्कार असो. जो जमिनीवर पडलेल्या अनेक मडक्याच्या तुकड्यांमधील केवळ एक मडक्याच्या तुकडा आहे. माती कुंभाराला म्हणते काय, ‘हे तू काय घडवित आहेस?’ तुझी हस्तकृती तुला म्हणते काय, ‘कुंभाराला तर हातच नाहीत’?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय! मातीच्या खापरांमध्ये एक खापर असा तो आहे. तू काय करतोस, असे चिखल आपल्या घडणाविऱ्याला म्हणेल काय? किंवा तुला हात नाहीत काय जेव्हा तू हे करतो?