Isaiah 46:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते स्वत:च्या खांद्यांवरून तो खोटा देव वाहून नेतात. तो देव निरूपयोगी आहे. लोकांना त्यास वाहून न्यावे लागते. लोक मूर्ती जमिनीवर बसवितात. तो देव हालू शकत नाही. तो त्याची जागा सोडून लांब जाऊ शकत नाही. लोक त्याच्याशी ओरडून बोलले तरी तो उत्तर देणार नाही, तो देव म्हणजे फक्त एक मूर्ती आहे, ती लोकांना संकटातून वाचवू शकणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापतात; तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हलत नाही; त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्यांना संकटांतून तारीत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्याला आपल्या खांद्यावर घेतात व वाहून नेतात; नंतर ते त्याला त्याच्या स्थानी ठेवतात, तेव्हा ते दैवत तिथेच राहते. त्या ठिकाणाहून त्याला हालता येत नाही. कोणी त्याचा धावा केला, तरी ते उत्तर देऊ शकत नाही; ते कोणालाही त्यांच्या संकटातून सोडवू शकत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आपल्या खांद्यांवर उचलून घेतात आणि वाहून नेतात; तो नेऊन त्याच्या जागी ठेवतात आणि तो त्याच्या जागेवर उभा राहतो व त्या जागेतून हालत नाही. ते त्यास आरोळी मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही किंवा कोणालाही त्याच्या संकटातून वाचवत नाही.