Isaiah 47:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा ‘सभ्य स्त्रिये,’ आता माझे ऐक! तुला आता सुरक्षित वाटते व तू स्वत:शीच म्हणतेस, ‘मीच तेवढी महत्वाची व्यक्ती आहे. माझ्यासारखे महत्वाचे कोणीही नाही. मी कधीच विधवा होणार नाही. मला नेहमीच संतती होईल.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अगे विलासिनी, जी तू निश्चिंत बसतेस व मनात म्हणतेस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही, मी विधवा होणार नाही, अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही,” ती तू हे ऐक:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अगे चैनबाजीचे वेड असणारी, सुरक्षितपणे विलासणारी, आणि स्वतःला म्हणणारी, ‘मीच आहे, माझ्यासारखे कोणीही नाही. मी कधीही विधवा होणार नाही माझी लेकरे मी कधी गमावणार नाही.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा आता हे ऐका, अगे विलासिनी जी तू सुरक्षितपणे बसली आहेस, जी तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणीच नाही; मी कधीच विधवा अशी बसणार नाही किंवा मला मुले गमवल्याचा अनुभव कधी येणार नाही.