Isaiah 48:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इकडे या आणि माझे ऐका. बाबेल राष्ट्र म्हणून जगायला लागले तेव्हा मी तेथे होतो आणि आरंभापासून मी स्पष्टपणे बोललो का तर लोकांना मी काय म्हणालो ते समजावे.” नंतर यशया म्हणाला, “आता परमेश्वर माझा देव, मला आणि त्याच्या आत्म्याला पुढील गोष्टी सांगायला तुमच्याकडे पाठवितो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही माझ्याजवळ या, हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही; ते होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच.” आणि आता प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठवले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझ्याजवळ या व हे लक्षपूर्वक ऐका: “माझ्या पहिल्या घोषणेपासूनच मी गुप्तपणे बोललो नाही; ज्यावेळी ते घडेल, मी तिथे हजर आहे.” आणि आता सार्वभौम याहवेहने, त्यांच्या पवित्र आत्म्याची देणगी देऊन मला पाठविले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या जवळ या आणि हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तात बोललो नाही, जेव्हा हे घडले, तेव्हा मी तीथे आहे. आणि आता परमेश्वर देवाने आणि त्याच्या आत्म्या ने मला पाठवले आहे.