Isaiah 48:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी परमेश्वर तुमचा तारणारा, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “मीच परमेश्वर तुमचा देव आहे. मी तुम्हाला सत्कृत्ये करायला शिकवितो. तुम्ही कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मी मार्गदर्शन करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह हे असे म्हणतात— जे तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत: “मी याहवेह, तुमचा परमेश्वर आहे, जो तुमच्या हितासाठीच तुम्हाला शिक्षण देतो, जे मार्ग तुम्ही अनुसरावे, त्यांनीच तुम्हाला मार्गस्थ करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो तुझा खंडून घेणारा, इस्राएलचा पवित्र परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वर तुझा देव, जो तुम्हास यशस्वी होण्यासाठी शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यामध्ये जो तुला चालवतो.