Isaiah 48:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणूनच गोष्टी घडायच्या कितीतरी आधी मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगितले, असे सांगण्याचे कारण हेच की आम्ही आमच्या सामर्थ्यावर हे सर्व केले असे तुम्ही म्हणू नये. ‘आमच्या मूर्तीनी हे सर्व घडवून आणले’ असे तुम्ही म्हणू नये म्हणून मी हे केले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून हे बहुत काळापूर्वीच तुला कळवले. ते घडण्यापूर्वीच तुला विदित केले; नाहीतर तू म्हणाला असतास की ‘माझ्या मूर्तीने ते केले; माझ्या कोरीव मूर्तीच्या आज्ञेने व माझ्या ओतीव मूर्तीच्या आज्ञेने ते झाले.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या; प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या, जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले; आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव मी तुला या गोष्टी आधीच घोषीत केल्या, त्या घडण्या अगोदरच मी तुला सांगितले, जेणेकरून तू असे म्हणू नये की, माझ्या मूर्तीने ती कृत्ये केली, आणि माझ्या कोरीव मूर्तीने व माझ्या ओतीव मूर्तीने ती आज्ञापिले.”