Isaiah 49:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वर पाहा, तुमच्या सभोवती पाहा. तुझी मुले एकत्र गोळा होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वर म्हणतो, “मी प्रत्यक्ष आहे आणि मी तुला पुढील गोष्टींचे वचन देतो. तुझी मुले गळ्यात शोभून दिसणाऱ्या रत्नांप्रमाणे होतील. नववधूने गळ्यात घालायच्या हाराप्रमाणे ती होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपले डोळे वर कर, चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की माझ्या जिवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वांना अलंकाराप्रमाणे लेशील; नववधूप्रमाणे तू त्यांना आपल्या अंगावर घालशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमची नजर वर उचला आणि सभोवती पाहा; तुमची सर्व संतती एकत्र येऊन तुमच्याकडे परत येतील. मी जिवंत आहे,” याहवेह घोषणा करतात, “तुम्ही त्यांना आभूषणाप्रमाणे अंगावर धारण कराल, वधूप्रमाणे तुम्ही त्यांना परिधान कराल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपल्या सभोवती नजर टाक आणि पाहा, ते सर्व एकत्र गोळा होऊन, तुझ्या कडे येतील. परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, खचित तू त्यांना दागिण्यांप्रमाणे आपल्या वर घालशील, एका नवरी सारखे तू त्यांना आपणावर घालशील.