Isaiah 49:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग तू मनाशी म्हणशील, ‘ही सर्व मुले मला कोणी दिली? हे फार चांगले आहे. मी दु:खी होते आणि एकटी होते. माझा पराभव केला गेला आणि मला माझ्या माणसांपासून दूर केले गेले. मग ही मुले मला कोणी दिली? पाहा मला एकटी सोडले, ही सर्व मुले कोठून आली?”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तू आपल्या मनात म्हणशील, ‘माझी मुले तर हिरावून नेली आहेत, मी वांझ आहे, मी स्वदेशाला मुकले आहे, व परागंदा झाले आहे, अशा माझ्यासाठी ह्यांना जन्म कोणी दिला? ह्यांना लहानाचे मोठे कोणी केले? पाहा, मी एकटीच उरले होते; ही कोठे होती?”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तू मनात म्हणशील, ‘यांना माझ्यासाठी कोणी जन्माला घातले? मी दुःखी व निर्वंश होते; मी बंदिवासात व नाकारलेली होते. माझ्यासाठी यांना कोणी वाढविले? मला एकटेच टाकण्यात आले होते, मग हे सर्व—कुठून आले?’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तू मनाशी म्हणशील, मी मुलांवेगळी झालेली, वांझ, हद्दपार झालेली व इकडे तिकडे भटकणारी अशी असता, माझ्यासाठी या मुलांना कोणी जन्म दिला?