Isaiah 49:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“त्या लोकांनी तुला दुखावले पण त्यांना स्वत:चेच मांस खायला मी लावीन. स्वत:च्याच रक्ताची त्यांना मद्यासारखी धुंदी चढेल. मी तुला वाचविले हे प्रत्येकाला माहीत होईल याकोबच्या सामर्थ्यवान परमेश्वराने तुझे रक्षण केले हे सर्वांना समजेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा छळ करणार्‍यांना स्वतःचेच मांस खायला लावीन; नव्या द्राक्षारसाने जसे लोक मस्त होतात तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील; ह्यावरून मी परमेश्वर तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे सर्व मानवजातीला समजेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन; आणि त्यांच्याच रक्ताच्या नद्यांचे रक्त पिऊन ते मद्य पिल्यासारखे धुंद होतील. मग हे सर्व मानवजातीला समजेल कि मी, याहवेह, तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता व याकोबाचा सर्वसमर्थ परमेश्वर आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी तुझ्या पीडणाऱ्यांना त्यांचेच मांस खायला लावीन, आणि जसे नव्या द्राक्षरसाने तसे ते स्वत:च्याच रक्ताने मद्यधुंद होतील. आणि सर्व मनुष्य जाणतील की, मी परमेश्वर, तुझा तारणारा आहे, आणि याकोबाचा समर्थ तुझा खंडणारा आहे.”