Isaiah 5:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लवकर उठून नशा आणणाऱ्या पेयाच्या शोधास लागणाऱ्यांनो तुमचा धिक्कार असो. तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे पहाटेस उठून मद्याच्या पाठीस लागतात, जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारस पिऊन धुंद होतात त्यांना धिक्कार असो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे सकाळी लवकर उठतात व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सकाळी उठून मद्याच्या शोधास लागणाऱ्यांनो तुम्हास हाय हाय! जे तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.