Isaiah 5:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणतो, “माझ्या लोकांना पकडून नेले जाईल. का? कारण ते समजदार नाहीत. त्यांच्यातील उच्चपदस्थांची उपासमार होईल. त्यांतील बहुसंख्य तहानेने तळमळतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत; त्यांतले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत, आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून असमजंसपणामुळे माझे लोक बंदिवासात नेले जातील; उच्च पदावरील लोक भुकेने मरतील आणि सर्वसाधारण लोक तहानेने कोरडे पडतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणांत गेले आहेत, त्यांचे अधिकारी भुकेले आहेत आणि त्यांच्या समुदायाला पिण्यास पाणी नाही.