Isaiah 50:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पाहा! तुम्ही लोक स्वत:च्या इच्छेप्रमाणे राहू इच्छिता. तुम्ही स्वत:चा अग्नी पेटविता आणि मशाली पाजळता. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे राहा. पण तुम्हाला शिक्षा होईल. स्वत:च पेटविलेल्या आगीत तुम्ही पडाल आणि जळाल. मी हे घडवून आणीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही कोलिते वागवता ते तुम्ही सर्व आपल्याच अग्नीच्या ज्वालेत चालते व्हा! तुम्ही स्वतः पेटवलेल्या कोलितांत जाऊन पडा! माझ्या हातून हे तुम्हांला घडेल; तुम्ही क्लेशात पडून राहाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता आणि स्वतःला जळत्या मशालीचा पुरवठा करता, जा, तुम्ही स्वतः प्रज्वलित केलेल्या, आणि तुम्ही ज्वलंत केलेल्या मशालीच्या प्रकाशात चला, माझ्यापासून मात्र तुम्हाला हे प्राप्त होईल: तुम्ही यातनामध्ये पडून राहाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, जे सर्व तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही स्वतःला मशालीसह सुसज्ज करता; ते तुम्ही आपल्या अग्नीच्या प्रकाशात आणि तुम्ही पेटविलेल्या ज्योतीत चाला. परमेश्वर म्हणतो, माझ्या हातून, हे तुमच्याकडे येईलः तुम्ही वेदनेच्या जागी खाली पडून रहाल.