Isaiah 50:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी घरी आलो तर घरी कोणीच नव्हते. मी खूप हाका मारल्या पण कोणीच उत्तर दिले नाही. मी तुमचे रक्षण करू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? तुमच्या सर्व संकटातून वाचविण्याचे सामर्थ्य माझ्यापाशी आहे. बघा! जर मी समुद्राला वाळून जाण्याची आज्ञा दिली, तर तो वाळून जाईल. मग पाणी नसल्याने मासे मरतील आणि त्यांना दुर्गंधी सुटेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आलो तेव्हा कोणी नव्हता; मी हाक मारली तेव्हा जबाब द्यायला कोणी नव्हता, ते का? मुक्त करवत नाही इतका माझा हात तोकडा झाला आहे काय? माझ्या ठायी सोडवण्याचे सामर्थ्य नाही काय? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो, नद्यांचे रान करतो; पाणी नसल्यामुळे त्यातील मासे कुजून त्यांची घाण येते, ते पाण्यावाचून मरतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात आणि तहानेने मरतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आलो पण तेथे कोणीच नव्हते का? मी हाक मारली पण कोणीच उत्तर दिले नाही का? माझा हात तुझी खंडणी देण्यास तोकडा होता? माझ्यात तुला सोडवण्याचे सामर्थ्य नाही का? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो; मी नद्यांचे वाळवंट करतो; त्यांचे मासे पाण्या अभावी मरतात आणि सडतात.