Isaiah 50:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी निष्पाप आहे हे तो जाणतो, म्हणून मी अपराधी आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. मी चुकत आहे असे कोणाला सिध्द करावेसे वाटत असेल तर त्याने माझ्याकडे यावे. आपण परीक्षा पाहू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे; माझ्याबरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू, माझा प्रतिवादी कोण असेल त्याने माझ्यापुढे यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत. मग माझ्याविरुद्ध कोण आरोप करेल? चला आपण एकमेकांचा सामना करू या! माझ्यावर आरोप करणारा कोण आहे? त्याने माझा सामना करावा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या.