Isaiah 51:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“माझ्या सेवका, मी माझे शब्द तुझ्या तोंडी घालीन. मी तुला माझ्या हाताने झाकून तुझे रक्षण करीन. नवीन स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करण्यासाठी मी तुझा उपयोग करीन. इस्राएलला ‘तुम्ही माझे लोक आहात.’ हे सांगण्यास मी तुला सांगीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा व ‘तू माझी प्रजा आहेस’ असे सीयोनेस म्हणावे म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली; आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी माझी वचने तुमच्या मुखात घातली आहेत आणि तुम्हाला माझ्या हाताच्या सावलीत झाकून ठेवले आहे— मीच आहे, ज्याने आकाशाला स्थिर असे ठेवले, आणि सर्व पृथ्वीसाठी पाया घातला, आणि जो सीयोनला म्हणतो, ‘तुम्ही माझे आहात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी माझे शब्द तुझ्या तोंडी घालीन आणि माझ्या हाताच्या छायेत तुला झाकले आहे. अशासाठी की, मी आकाशाची स्थापना करावी आणि पृथ्वीचा पाया घालावा, आणि तू माझी प्रजा आहे, असे सियोनेला म्हणावे.