Isaiah 51:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ऊठ, ऊठ, यरूशलेम, जागी हो. परमेश्वर तुझ्यावर फार रागावला होता. म्हणून तुला शिक्षा झाली. विषाचा प्याला प्यायला लागावा तशी ही शिक्षा होती. तू तो विषाचा प्याला प्यायलीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ऊठ, ऊठ! अगे यरुशलेमे, जागी हो, तू, जिने क्रोधाचा प्याला याहवेहच्या हातून भरपूर प्याला आहे, दहशतीचा प्याला तू गाळासकट पिऊन टाकला आहेस, तो प्याला, जो लोकांना मद्यधुंद करून अडखळवितो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ऊठ, ऊठ, यरूशलेमे, जागी हो. तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन घेतला आहे. तू थरकापाच्या प्याल्यांतला गाळ चोखून पिऊन घेतला आहे.