Isaiah 51:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दोन-दोनच्या गटाने यरूशलेमवर संकटे आली चोरी आणि नुकसान, भूक आणि युध्द. तू संकटात असताना तुला कोणीही मदत केली नाही. कोणी तुझ्यावर दया केली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्यावर ह्या दोन गोष्टी गुदरल्या: उजाडी व नाश, दुष्काळ व तलवार; तुझे समाधान कोण करील? मी तुझे सांत्वन कसे करू?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ओसाडी आणि विध्वंस, दुष्काळ आणि तलवार ही दुप्पट अरिष्टे तुझ्यावर आली आहेत— कोण तुझे सांत्वन करू शकेल? कोण तुझे दुःखपरिहार करू शकेल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही दोन संकटे तुझ्यावर आली, तुझ्याबरोबर कोण दु:ख करणार? उजाडी व नाश आणि दुष्काळ व तलवार, कोण तुझे सांत्वन करणार?