Isaiah 51:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अब्राहाम तुमचा पिता आहे. तुम्ही त्याच्याकडे पाहावे. जिने तुम्हाला जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहावे. मी बोलाविले तेव्हा अब्राहाम एकटा होता. मी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याने मोठ्या वंशाचा आरंभ केला. त्याचा वंश खूप वाढला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अब्राहाम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्यांच्याकडे लक्ष द्या; तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलावले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होय, तुमचा पिता अब्राहामाकडे, आणि साराहकडे, जिने तुम्हाला जन्म दिला, त्यांच्याकडे बघा. मी अब्राहामाला बोलाविले, तेव्हा तो एकटा होता, मी त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा तो बहुगुणित झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अब्राहामाकडे पाहा जो तुमचा पूर्वज आहे आणि जिने तुम्हास जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहा. कारण जेव्हा मी त्याला बोलावले तेव्हा तो एकटाच होता. मी त्यास बोलावले, मी त्यास आशीर्वाद दिला आणि त्याचे पुष्कळ केले.”